Sunday, February 15, 2026

ती...

इतकी नाजूक इतकी अल्लद फुलपाखराहून अलवार
चालू बघता नकळत होते वाऱ्यावरती अलगद स्वार..
निजल्या देही गवाक्षतुनी चंद्रकिरण ते पडता चार
लक्ख गोरटी रापून झाली रात्रीत एका सावळ नार...
इतकी नाजूक जरा तिचे मी जोर देउनी लिहता नाव
दावीत आली दुसऱ्या दिवशी अंगांगावर हळवे घाव...
इतकी नाजूक इतकी सुंदर दर्पण देखील खुळावतो
ती गेल्यावर ही तो क्षणभर प्रतिबिंबाला धरू बघतो...
इतकी नाजूक कि जेव्हा ती पावसात जावू बघते
भीती वाटते कारण जळात साखर क्षणात विरघळते...
इतकी नाजूक की आता तर स्मरणाचे हि भय वाटे
नको रुताया फुलास असल्या माझ्या जगण्यातील काटे...

तिच्या बद्दल जितकं लिहावा तितकं कमी आहे.. मी इतकं सुंदर लिहू शकत नाही.. पण संदीप ने कदाचित हे गाणं तिच्यासाठीच लिहिलंय... कवितेचा नाव मी इथे लिहू शकत नाही.. पण त्याची गरजही नाही...

~अनिकेत

1 comment:

Anonymous said...

It is interesting to see that you also dabble in poetry like our great baba albeit in an "under the covers" mode.
Do continue blogging though. I find it is a great outlet when you can't articulate what you are feeling through speech.